शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील हवालदार खंडुसिंग गिरासे सैन्य दलामधुन सेवा निवृत्त

शहादा (प्रतिनिधी) : तालुक्यातील काथर्दे दिगर येथील हवालदार श्री खंडुसिंग भगवानसिंग गिरासे यांनी १८ वर्षांची देश सेवा ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत सैन्य दलाला समर्पित केली.

गेल्या १८ वर्षापासून काथर्दे दिगर येथील खंडुसिंग भगवानसिंग गिरासे इंडियन आर्मीमध्ये एअर फिल्ड म्हणून कार्यरत होते. त्यांची आर्मीमध्ये जाण्याची लहानपणापासूनच मनाशी दृढ निश्चय केला होता. त्यांना आई वडील नाही तरी त्यांनी कधीच हार न मानता प्रयत्न चालू ठेवले त्यानंतर १२ वी वर्षे पूर्ण केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश प्राप्त करून दाखवले आणि आर्मी एविएशनमध्ये सिलेक्शन झाले.

या १८ वर्षांची कामगिरी पाहता त्यांना दोन बेस्ट अवार्ड देण्यात आले पहिला अवार्ड २०१३ मध्ये चिफ ऑफ आर्मी स्टाफ गण बिक्रमसिंग फ्लाईट सेफ्टी अवार्डनी त्यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर २०१६ मध्ये एक हेलीकॉप्टर चे ब्लेडमध्ये क्रेक फाईंड केले म्हणून या उत्कृष्ट कामगिरी बद्दल २०१६ ला डायरेक्टर गणकडून मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. ते नाशिक (गांधी नगर) येथे कार्यरत होते. व अखेर १८ वर्षांची देश सेवा सैन्य दलाला समर्पित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here