तारक मेहता’ फेम नट्टू काका यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सर्वांचे लाकडे नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचं रविवारी निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचं निधन झाल्याचे सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते तारक मेहता का उल्टा चश्माच्या शूटिंगवर देखील आले नव्हते. काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मागील ५० हून अधिक वर्षापासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांनी खरी ओळख आणि प्रसिद्धी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेनं दिली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. नट्टू काका हे मालिकेत पहिल्यापासून जोडलेले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडायचे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींना त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here