परंडा तालुक्यात संतापजनक घटना; टाकळी येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

पीडित मुलीवर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून अटक

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) : दळण आणण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संताप जनक घटना परंडा तालुक्यातील टाकळी येथे घडली या प्रकरणी आरोपी प्रकाश बारसकर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, टाकळी येथील ११ वर्षीय मुलगी दळण आनण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असताना आरोपी प्रकाश बारसकर याने मुलीच्या हताला धरून बाजुच्या कापूस पिकात ओढत नेहले व तोंड दाबुन बलात्कार केला व कोणास सांगीतल्यास जिवे मारीन अशी धमकी दिली .घाबरलेल्या पिडीत मुलीने झालेली घ घटना घरी सांगीतल्याने आरोपी विरूद्ध परंडा पोलिसात फिर्याद देण्यात आली आरोपी प्रकाश बारसकर विरोधात परंडा पोलिसात बाल लैंगीक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

घटने चे गांर्भीय पाहून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली आरोपीस तात्काळ अटक करन्यात आले घटनेचा पुढील तपास डी.वाय एसपी कार्यालयाचे भुमचे पोलिस निरिक्षक बिराजदार यांच्या कडे देण्यात आला आहे. टाकळी बलात्कार घटनेचा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने निषेध करून बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा देन्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करन्यात आली आहे .

paranda-tahshildar

दि १ ऑक्टोबर रोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे टाकळी येथील घटना संपुर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा लवकरात लवकर निकाल लावन्यात यावा अन्यथा संघटनेचा वतीने तिव्र अंदोलन करन्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे . निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री , जिल्हा पोलिस अधिक्षक , तहसिलदार परंडा , पोलिस निरिक्षक व मी वडार महाराष्ट्राचा संघटने चे संस्थापक अध्यक्ष विजय चौघुले यांना देण्यात आल्या आहेत .

निवेदनावर , मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा अध्यक्ष अविनाश ईटकर, जि उपाध्यक्ष सुनिल पवार , तालूका अध्यक्ष भास्कर ईटकर , राम ईटकर , ब्रम्हदेव मांजरे , परमेश्वर पवार , शामराव पवार , अमर भोसले , चंदू पवार , अविनाथ भोसले , शंकर पवार , अनिल पवार , नवनाथ पवार , बिभीषण पवार , दिलीप पवार , भीमा जाधव , यशवंत काळे , शिवराम पवार , अनिल जाधव , दिलीप पवार ,यांच्या सह आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here