फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद; कधी होणार सुरु फेसबुकच्या ट्विटर अकाऊंटवर माहिती

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन झाल्याने नेटीझन्सना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कधी दूर होतील किंवा पूर्ववत कधी होतील याबाबतची माहिती आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

फेसबुक वापरकर्त्यांना न्यूज फीड रिफ्रेश करता येत नाहीए. इन्स्टाग्रामवरही सारखीच परिस्थिती आहे. व्हॉट्स ऍपचा वापर कोट्यवधी लोक करतात. दर तासाला अब्जावधी मेसेजची देवाणघेवाण होते. मात्र व्हॉट्स ऍपची सेवा ठप्प झाल्यानं वापरकर्ते हैराण झाले आहेत. व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचे सर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरात कोट्यवधी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हाट्सअॅप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद’, असं फेसबुक आणि व्हाट्सअॅप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here