कात्रज बायपासजवळ ट्रकची पादचाऱ्याला धडक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत इन्शुरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कात्रज देहू रोड बायपासजवळ घडला. अशोक काशिनाथ निरगुडे (वय ३६ रा. आंबेगाव पठार) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक निरगुडे सोमवारी दुपारी दुचाकीवरून कात्रजहून नवलेपुलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने अशोक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here