पालघर (जिल्हा प्रतिनिधी सचिन करवीर) : सगळ्या भंगारवालेचे धंदे भंगारावर असतील तर आगाशीत भंगार दररोज किती निघते.? एका भंगार गोडाऊनमध्ये पाच सहा कुटूंब राहतात क्रॉसनाका येथे तर १२ ते १४ कुटूंब राहतात. सकाळी लवकर आपल्या आगाशी नाक्यावर येऊन बघा ६० ते ८० जण ऊभे असतील त्यापैकी फक्त ५ जण ओळखीचे सापडतील एवढे भंगारवाले आले कुठून?
बरं या बंगारवाल्यांच्या बायका विरारला घरकामाला जातात ह्यांची मुले आपल्याच शाळेत. काही वेळेस आगाशीत राहून आपल्या मुलांना अॅडमिशन मिळत नाही. आपल्याच गावातील लोकांनी ह्याना वाडी करता येत नाही म्हणून भंगारवालेना भाड्याने दिल्या. ह्यांना लोकांच्या जमीनीत संडासला पाठवायचे. हे लोक नारळ भाजीपाला फळे सूपारी मासली चे धंदे घेऊन बसले आहेत. आताच ह्यांना चाप लावायला हवा नाहीतर आगाशी सोपारचे टाकीपाडा व्हायला वेळ लागणार नाही.
परवाच दोन भंगारवाले केबल घेऊन चिखलडोंगरी रोडवर जाळायला घेऊन जात होते त्यांना आगाशी सामाजिक कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडी, विरारचे स्वप्निल कवळी यांनी हटकले आणि परत पाठवले. आता त्यांनी आगाशीतील सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करीत, आगाशी सुरक्षित कशी राहील ह्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.







