वैद्यकीय, सामाजिक योगदानाबद्दल डॉ. सुनिता मोरे यांचा गौरव

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जिद्द फाउंडेशन व पुणे सोशल फाउंडेशन (पीएसएफ) यांच्यातर्फे वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. सुनीता मोरे यांना ‘कै. लक्ष्मण शिंदे स्मृती पुणे भूषण पुरस्कार’ मिळाला आहे.सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. मोरे या कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी या माध्यमातून २४६० शिबिरांचे आयोजन करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. सुनीता मोरे यांनी सामाजिक, वैद्यकीय, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, राजकीय , सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले आहे.

रोटरी,पर्वती नागरी कृती समिती,भगिनी हेल्पलाईन,सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय चिकित्सक सन्मान,माऊली कृतज्ञता गौरव,पर्वती भूषण,बिबवेवाडी भूषण पुरस्कार, स्वयंसिध्दा, गॉड ऑफ अर्थ, ‘मी पदवीधर’ असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here