कारंजा (तालुका प्रतिनिधी हफिज खान) : ठाणेदार आधारसिंग सोनवणे साहेबांना दिनांक ५ ऑक्टोबरला रात्री २.३६ वाजता त्यांच्या वैयक्तिक मोबा.नंबर वर कॉल करताच ताबडतोब प्रतिसाद देउन अगदी 6 मिनीटात गाडी पाठवून परिस्थितीची पाहणी केली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परिसरातील एका व्यक्तिच्या घरी सीसीटीव्हीमध्ये १० ते १२ जण हातात काठ्या व टॉर्च घेऊन गल्लीतून येतांना दिसले. जवळ येताच विद्यूत पुरवठा बंद झाला. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मला फोन लाऊन प्रसंग सांगीतला . घटणेचे गांभीर्य ओळखून मी आजूबाजूला पाहीले . पण कोणीच दिसले नाही.
शेवटी पोलीस स्टेशनच्या दूरध्वनी वर दोनदा फोन लावला . परंतू तांत्रीक कारणामुळे सपर्क होऊ शकला नाही . तेव्हा संपूर्ण शहरात वार्ड सभा घेऊन साहेबांनी आपले वैयक्तिक मो. नं. शेयर केलेले मला आठवले अशा जिंदादिल रक्षणकर्त्या अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा विचार मनात आला . एवढया रात्री पोलिस स्टेशन ऐवजी प्रत्यक्ष साहेबांना फोन करण्यासाठी संकोच वाटत होता .
नाईलाजास्तव फोन लावताच एवढ्या रात्री साहेबांनी संपूर्ण प्रसंग ऐकून अगदी सहाव्या मिनीटात आपली गाडी पाठवली . साहेब स्वतः प्रत्येक घटनाक्रमाचा आढावा घेत होते. आलेल्या पथकाने शोधाशोध केली असता ते १०-१२ व्यक्ति जवळच्याच कॉलनीतील असून स्वप्रेरणेने गस्त घालत असल्याचे आढळले.






