अमरावती जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ना. बच्चू कडू यांची दमदार एन्ट्री

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच लक्ष वेधून घेणाऱ्या अमरावती जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ना बच्छु कडूंनी चांदुरबाजार सेवा संघ मतदारसंघ गटातील सहकार पॅनलचे उमेदवार बबलु देशमुख यांचा पराभव करून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आपलं वर्चस्व निर्माण केले.

चांदुर बाजार मतदारसंघात ४१ मतदार संख्या होती त्यापैकी २१ मते मिळवून विजयी सलामी दिली, विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलु देशमुख यांच्या २४ तास निगराणीत असलेली दोन मते कशी फुटली याचीच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत होती, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत चांदुरबाजार सेवा संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालाची अधिकृत घोषणा होण्याअगोदरच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करून परीसर दणाणून सोडला होता, ना.बच्चू कडूंच्या विजयाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले.

विशेषतः कसमादे मध्ये देवळा तालुक्यातील खर्डा, वसाका, सटाणा मालेगाव चांदवड येथील प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. सहकार पॅनलचे नेते व उमेदवार बबलू देशमुख यांनी अत्यंत प्रतिष्टेच्या केलेल्या निवडणुकीत एकुण ४१ मतदारांपैकी अगदी मतदान केंद्रावर जाईपर्यंत २१ मते सोबत ठेवली असताना २ मत फुटलीच कशी? असा सवाल सर्वत्र ऐकावयास मिळत होता.

विधानसभा निवडणुकीत सतत तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले बच्चूभाऊ यांनी सहकार क्षेत्रात दे धक्का स्टाईलने एन्ट्री करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सत्य बाहेर येण्यास मदत होईल व भविष्यात सहकारी साखर कारखाने व सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण बसेल असा विश्वास नुकताच सहकार भूषण पुरस्कार प्राप्त व नाशिक जिल्हा सहकार आघाडीचे माजी अध्यक्ष कुबेर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

अमरावती जिल्हा बॅंके बरोबर महाराष्ट्र राज्य शिखर बँकत ही भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभाराची आशा व्यक्त करत बच्चूभाउंच्या विजयाचे जोरदार स्वागत केले आहे. वसाका कार्यस्थळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला यावेळी निलेश पाटील,दीपक पवार बाळु पवार ,मुन्ना पवार रावसाहेब पवार, रवि पवार आदी बच्चू कडूंचे समर्थक हजर होते , तसेच देवळा तालुक्यातील खर्डा येथे प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, बापू देवरे, दशरथ पुरकर आदी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here