धरणगाव (योगेश पी पाटील) – महाराष्ट्र शासनाच्या पणन महासंघाचे (फेडरेशन) तर्फे धरणगांव शहरातील ३ते४ जिनिंग मध्ये शासनामार्फत कापूस खरेदीसाठी परवानग्या दिल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी आपली नावे नोंदविलेली असतील खरेदीसाठी त्यांना कापूस विक्रीसाठी मार्केट कमिटी मधून टोकन दिले जात होते व त्यांचा कापूस खरेदी केला जात होता.
दि.५ ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी नावे नोंदविली असतील त्यांनी फेडरेशन मार्फत जिनिंग मध्ये कापूस मोजून घ्यावा त्यानंतर कापूस खरेदी बंद होणार असल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले होते.त्यामुळे ५ऑगस्ट सायंकाळी ५:३० वाजे पर्यंत कापूस खरेदी केल्यानंतर ६ऑगस्टपासून खरेदी बंद करण्यात आली होती.परंतु काही अपरिहार्य कारणास्तव असेल किंवा शेतकऱ्यांच्या वाचण्यात मार्केट कमिटीचे जाहिरात वाचता न आल्यामुळे काही नावे नोंदविलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही.
६ ऑगस्ट रोजी अमळनेर,भडगांव,धरणगांव येथील शेतकरी आपला माल घेऊन धरणगांव येथे आले असता खरेदी बंदचे आदेश आल्यामुळे आम्ही माल खरेदी करू शकलो नाहीत शेतकऱ्यांनी भाड्याचे वाहन करून ट्रॅक्टर ,चार चाकी गाड्या भरून कापूस आणला गेला होता कापूसही मोजला जाणार नाही व वरून भाडे सुद्धा दयावे लागेल.
त्यातील काही शेतकऱ्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर यांच्या जवळ आपली व्यथा मांडली सरांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व आपण पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर.जी.घुले, व संचालक संजय पवार,यांच्याशी चर्चा करून नियमानुसार नाव नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांना वार्यावर सोडू नका काही अडचणीमुळे त्यांना वेळेवर माल आणता आला नाही आपण जिनिंग ग्रेडर यांना आदेश दिलेत तर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल त्यानुसार स्वतः आर.जी.घुले व्यवस्थापक, ग्रेडर एस.पी जाधव,शरद पाटील यांनी एस.के कॉटनचे मालक श्री मृतुजा बोहरी यांना सांगून आलेच्या शेतकऱ्यांना परत न पाठवता माल मोजून घ्या असे आदेश दिले आज माल मोजला गेला नसला तर उद्या कपाशी अतिअल्वदरात शेतकऱ्यांना खरेदी करावी लागली असती.जवळ जवळ २२६ क्विंटल कपाशी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने एस.के कॉटन धरणगांव येथे मोजली गेली फक्त धरणगांवच्या शेतकऱ्यांची नव्हे तर अमळनेर,भडगांव येथील सुद्धा शेतकऱ्यांची कपाशी मोजली गेली व त्यांना तस्या पावत्या दिल्या गेल्या. सर्व शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.







