पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
‘इमर्जिंग ट्रेंड्स ऑन कॉम्बॅटिंग मल्टीड्रग रेझिस्टंट सुपरबग्ज ‘ या विषयावर ही परिषद ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी पार पडली. डॉ एलिझाबेथ कुटर, डॉ. हेमराज नंदनवार ,डॉ सिद्धार्थ चोप्रा, डॉ. प्रशांत ढाकेफाळकर, डॉ.ज्योतीका राजवाडे यांनी मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ.शैला बुटवाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. देवप्रिया मुजुमदार,शिल्पा तांबे यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
१७० जण या परिषदेत सहभागी झाले.समारोप समारंभात भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.






