शिक्षणात भविष्यकेंद्रीत आणि तंत्रस्नेही दृष्टिकोनाची गरज :कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे

एनबीए अॅक्रीडिटेशन विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी झाले .

‘एनबीए अॅक्रीडिटेशनची तयारी ‘ हा या कार्यशाळेचा विषय होता. या कार्यशाळेमध्ये भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव ,कर्नल व्यंकट, डॉ अजित थेटे, डॉ शैला सुब्रमण्यम ,सचिन गेंगजे हे मान्यवर उद्घाटन समारंभास उपस्थित होते .डॉ आनंद भालेराव कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.

‘ सध्याचा शैक्षणिक परिप्रेक्ष्य पाहता तंत्रस्नेही ,भविष्यकेंद्रित, शिक्षण केंद्रित आणि रोजगाराभिमुख दृष्टिकोण अध्यापनात असला पाहिजे ‘, असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले .ते म्हणाले, ‘ शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रशिक्षण परिषदेची मार्गदर्शन योजना उपयुक्त ठरेल. हा सकारात्मक आणि उत्साह वाढवणारा उपक्रम आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे .

डॉ आनंद भालेराव म्हणाले, ‘ शिक्षण संस्थांपुढे गुणवत्ता वाढीचे आव्हान सतत उभे असते. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांना नव्या नेतृत्वासाठी गुणवत्तापूर्णरित्या तयार करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. शैक्षणिक संस्थांना त्यासाठी एम बी ए अॅक्रेडिटेशन मिळवून गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करणे आवश्यक ठरते .संस्थांनी स्वतःमध्ये सातत्याने प्रगती साधणे हे महत्वाचे उद्दिष्ट प्राप्त केले पाहिजे. ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here