कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने उडाली खळबळ

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसंच राज्यातील मंदिरंही आजपासून उघडण्यात आली आहे. अशावेळी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here