आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आर्यन २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज त्याची कोठडी संपणार होती. त्यामुळे त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबरपर्यंत कोठडी मागितली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आर्यनचा कोठडीतील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्याही कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या तिघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यासोबतच वकिलांनी दुसरी याचिका दाखल केली असून त्यात एनसीबीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, आर्यन कोडवर्डमध्ये चॅट करत असे आणि हे डीकोड करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. त्याच्या अनेक चॅटमधून त्याचे डीलर्सशी संबंध असल्याचे उघड झाले. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याचे देखील स्पष्ट होत आहे. आरोपींनी ड्रग्स पॅडलरशी व्यवहार करण्यासाठी कोडवर्डचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत आरोपींना रिमांडमध्ये समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे, असे ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here