मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ‘स्री’ आणि ‘लुका छुपी’च्या यशानंतर दिनेश विजान पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘हम दो, हमारे दो’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि कृति सेनन मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
‘हम दो हमारे दो’च्या टीझरची सुरुवात स्री, लुका छुपी, बाला आणि मिमी यासारख्या चित्रपटांच्या उल्लेखाने होते. यानंतर कृति आणि राजकुमार यांना इंट्रोड्यूस करत टीझरमध्ये परेश रावल यांच्या आवाजात ‘अब हमारा हीरो क्या करेगा?’ असा सवाल करताना दिसते.या चित्रपटाची कथा अभिषेक जैन, प्रशांत झा आणि अभिजीत खुमान यांनी लिहिली आहे. ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट एका युवा जोडप्यावर आधारित असून ते आपल्या जीवनातील एकटेपणा दुर करण्यासाठी आई-वडिलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतात.
या टीझरसोबतच निर्मात्यांनी त्याची रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. अभिषेक जैन द्वारा दिग्दर्शित ‘हम दो हमारे दो’चा प्रीमियर २९ ऑक्टोबर रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात कृति सेनन आणि राजकुमार रावसह परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ति खुराना यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
.






