जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जळगाव मनपा हद्दीतील रहिवाशांचा आपण घरपट्टी प्रस्तावित करयोग्यमूल्य निर्धारणेचे विवरण संदर्भात तील आपण सर्व घरांना नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये आपण येत्या सण २०२१ – २२ मध्ये अधिकचा कर वसूल करणार आहे त्यामध्ये आपण तीन पट कर वसूल करणार आहेत त्यामध्ये सामान्य कर,अपेक्षित करयोग्यमूल्य आणि अपेक्षित वार्षिक भाडेमुल्यकर हा प्रत्यक्ष प्रमाणात वाढणार आहे.
आपण जळगाव शहराची परिस्थिती बघता तिथे नागरिकांना पायी चालायची सुद्धा सोय नाही,रोड,गटारी नाही पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुमते काही ठिकाणी तर स्ट्रीटलाइट सुद्धा नाही आणि कोरोना काळामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे ते पाहता आपण हा कर रद्द करावा आणि आम्ही सध्या स्थितीमध्ये जो आम्ही कर भरतो आहे ते बघता आम्हाला मागील दहा वर्षांमध्ये कुठलीच सुविधा उपलब्ध झालेले नाही मग आम्ही हा कर का म्हणून भरायचा अशा त्रासांमध्ये नागरिक या ठिकाणी जीवनमरणाचा संघर्ष करीत आहे त्यामध्ये महानगरपालिका अधिकचा कर भरायला लावत आहे, अशा परिस्थितीत कर भरायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने जाणून-बुजून नागरिकांचं रक्त पिण्याचे काम करते.
आम्ही कर भरायलाही तयार आहोत परंतु आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध व्हायला हव्यात अन्यथा आम्ही जो कर आता भरत आहोत तोसुद्धा भरणार नाही असे निवेदन द्वारे धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश शेळके,अजय इंगोल, राजेंद्र सणस,वीरेंद्र हेबाडे,निशांत पाटील आणि धर्मरथ फाऊंडेशन अध्यक्ष विनायक पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले.






