अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना शाखा कारंजा जिल्हा वाशिम यांच्यावतीने धरणे आंदोलन

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफिज खान) : अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना शाखा कारंजा जिल्हा वाशिम यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सफाई कामगारांच्या रास्त मागण्याची पूर्तता दिनांक 06/10/21 पर्यंत न झाल्यास दिनांक 08/10/2021 पासून धरणे आंदोलन उपोषण मोर्चा घंटानाद गेट मिटिंग व बेमुद्दत काम बंद असे विविध प्रकारे आंदोलन सुरू करण्याची नोटीस दिली आहे.

यासंदर्भातील विषयास अनुसरून नोटीस देण्यात येते की सफाई कामगाराच्या रास्त मागण्याचे निवेदन व धरणे आंदोलन करण्यात आले खालील प्रलंबित मागण्याचे परिशिष्ट वीस वर्षापासून थकित असलेले पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगाच्या पहिला व दुसरा हप्ता देण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना जागा उपलब्ध करून घरे बांधून देण्यात यावी. शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत कपात केलेल्या नवीन सफाई कामगारांच्या रकमा परत करण्यात याव्यात शासन अनुदान प्राप्त झाल्याबरोबर वेतन देण्यात यावे शासन निर्णयानुसार सन 2016 पासून लागू करण्यात आले शासकीय सुट्ट्या च्या लाभ शनिवार-रविवार धरून देण्यात यावा त्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याचा मोबदला म्हणून एक दिवसीय नुसार त्याचा फरक देण्यात यावा लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना वारसांना 30 दिवसाच्या आत वारसाहक्क प्रमाणे नियुक्ती देण्यात यावी प्रस्तावित आकृतबंधात लोकसंख्येनुसार सफाई कामगारांची पदे भरविण्यात यावी सर्व सफाई कामगारांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेऊन बारा वर्षे चोवीस वर्षे वेतनश्रेणी लावून त्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी ची रक्कम व इतर मिळणारे फायदे व त्याचबरोबर संस्थेची कर्ज प्रकरणी थकीत भरणा लवकरात लवकर करण्यात यावा.

majdoor-nivedansafai-majdoor-andolan

शासनाच्या धोरणानुसार सफाई कामगारांना मापदंडाप्रमाणे काम मोजून काम देण्यात यावे सर्व सफाई कर्मचारी व कामगारांना गणवेश कामाचे साहित्य देण्यात यावे सफाई कर्मचारी आयोगाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या प्रकारच्या मागण्या अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना शाखा कारंजा जिल्हा वाशिम यांच्या वतीने करण्यात आल्या या धरणे आंदोलनात उपस्थित सर्व अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना शाखा कारंजा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनमध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here