चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर एनसीबीचा छापा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. एनसीबीने अचानक हा छापा मारला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. एनसीबीने म्हटले आहे की, छाप्याची लिंक क्रूझ जहाजावरील छाप्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे. यापूर्वीही इम्तियाज खत्रीवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर ड्रग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. इम्तियाज खत्री हा मुंबईच्या एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. इम्तियाज खत्रीचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सशी जवळचे संबंध आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणातही ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी त्याची अनेक वेळा चौकशीही करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here