अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात व अक्कलकोट तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे कुरनूर धरण यंदा ओव्हरफ्लो भरले आहे धरणाचे धोका ओळखून दररोज खाली पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्याने नदीकाठच्या प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात यंदा महापूराचा फटका बसला आहे त्यात अनेक शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेले शेती खरडून गेली विजेचे खांब पडले शेतातील पिके संपूर्ण जमीनदोस्त झाले अनेकांचे घरेही पडले शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे
त्यासाठी तहसीलदार यांना आज दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी भेट घेऊन नदीकाठच्या गावांचा तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन दिले असता तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही संबधित अधिकाऱ्यांना पंचनामेचे आदेश दिले असून येत्या काही दिवसांत पंचनामे सुरू होईल व शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल असा शब्द यावेळी दिले
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती अँड आनंदराव सोनकांबळे व बाबासाहेब पाटील ,डॉ. उदयकुमार म्हेत्रे ,सह आदींची उपस्थित होते.






