वर्तणूक प्रमाणपत्रासाठी घेतो पैसे; महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : येथील पोलीस पाटील कारभारी नामदेव नरवडे हा शासनाच्या विविध ठिकाणी लागणारे वर्तणूक प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून दोनशे ते तीनशे रुपये महसूल प्रशासनाचे नाव पुढे करीत फीस म्हणून पैसे घेत आहे.तसेच याने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे हा अवैध धदेवालयाकडून वाळूवाले दारुवाले जूगार वाले देशी-विदेशी गावरान दारू विक्रेते यांच्याकडून महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये हप्ता म्हणून वसुली जमा करीत आहे
सध्या तरी या पोलीस पाटलाची बाजार सावंगीत दुकानदारी जोरात सुरू असून याचीही दुकानदारी झिरो पोलीस व पोलीस यांच्या आश्रयाखाली सुरू आहे यात काही लबाड कोल्हे काही. खादाड पोलिस कर्मचारीही आहेत हा पोलीस पाटील सर्वसामान्य नागरिकांना दम देत उद्धट भाषा बोलतो महसूल प्रशासनाच्या मानधनावर काम करणाऱ्या या पोलीस पाटलाचे मानधन बंद करून याची पोलीस पाटील की रद्द करण्यात यावी पोलिस पाटलाच्या दुकानदारीकडे या पोलीस पाटलांनी तर कायदा व सुव्यवस्थेची पार वाट लावून टाकली आहे
एस.डी.एम उपविभागीय अधिकारी कन्नड व तहसीलदार खुलताबाद यांनी स्वतः लक्ष देऊन पोलीस पाटला ची दुकानदारी हप्ता वसुली थांबवण्यात येऊन याच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे बाजार सावंगीत पोलीस पाटलाची दुकानदारी जोरात अवैध हप्ता वसुली महसूल प्रशासनाच्या नावाखाली मोहीम बाबतीत माननीय उपविभागीय अधिकारी महसूल कन्नड यांना निवेदनही देण्यात आले आहे.






