हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : येथे २ अक्टूबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त टेक मास्टर कॉम्पुटर एज्युकेशन, डी सॉफ्ट कोचिंग सेंटर व किड्स ब्राइट फ्युचर स्पोर्टिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातील ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
आजच्या नवीन पिढीला महात्मा गांधी बद्दल माहिती मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशाच अनेक विषयांवरील ऑनलाईन स्पर्धांचे यापुढे आयोजन करण्याचा मानस टेक मास्टर कॉम्पुटरचे संचालक दीपक जोशी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक केतकी चौधरी, मुस्तफा बक्ष, पवन काजल ढगे, धनश्री इंदूरकर, गौरी वाघमारे या सर्व स्पर्धकांनी ३८ पैकी ३८ गुण मिळवून यश प्राप्त केले द्वितीय क्रमांकावर कृष्णाइ गवरकर, अलीमुर्तज़ा बख्श, मनस्वी गोडे, साक्षी खेलकर, मनस्वी तेलंग, निधी बोरकर,तेजस उघडे, अनुष्का, कृश बोरकर, नवसबा खान, रेश्मा शेख, ऍनि पॉल, प्रतीक्षा गौलकर, योगिता गौलकर, इत्यादिनी ३८ पैकी ३६ गुण प्राप्त करुण द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
त्तृतीय पुरस्कारसाठी सार्थक जोढे, कल्याणी मालेकर, पूर्वा चिंतलवार, इशा बोरेकर, ऋषिकेश, क्षितिजा धवळे, श्रुष्ठी खेलकर, कशीष धवळे, बुशरा शेख, ऋषिकेश डफ, बॉबी भोभाटे, रुबी बोभाटे, यांनी ३८ पैकी ३४ गुण प्राप्त करून तृतीय पुरस्कार मिळवला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने अजय फुलझेले सर, राकेश शर्मा, अब्दुल कदिर बक्ष, दीपक जोशी, मुस्तफा बक्ष, अजय बारसागडे, आणि समस्त स्पर्धक उपस्थित होते






