चित्रलेखा मालपाणी यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या हस्ते वाटले गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : येणारा थंडीचा काळ लक्षात घेता गरजू व गरीब लोकांना मायेची ऊब मिळावी या उद्देशाने नवरात्री व आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दाणा बाजार व सुभाष चौक परिसरातील गरीब व गरजू लोकांना रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक सौ.चित्रलेखा मालपाणी यांच्याद्वारे ब्लँकेट वाटप करण्यात आले.



आज दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी जळगाव येथील सुभाष चौकातील भवानी मंदिर दाणा बाजार येथे नवरात्री व आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी त्यांच्या दोघा मुलींकडून कु.जान्हवी मालपाणी,व कु.रिध्दी मालपाणी यांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here