महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेनेची गांधीगिरी

बीड (प्रतिनिधी) : लखमीपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेनेचे शिवसैनिक सकाळी सहापासूनच रस्त्यावर उतरले आहेत.



व्यापाऱ्यांचे सहकार्य या बंदला लाभावे म्हणून शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन केले जात आहे. यावेळी शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुते, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बाप्पासाहेब घुगे हे नेते या गांधीगिरीच्या मार्गानी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.



यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here