बेवारस बॅगेमुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : एकीकडे महाराष्ट्र बंद पाळला जात असल्याने, पोलिसांवर असलेले बंदोबस्ताचे दडपण त्याचवेळी दुपारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरात बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र काही काळाच्या तपासानंतर ती बॅग एका अपंग व्यक्तीची असल्याचे अखेर समोर आल्याने ठाणेकरांनीसुटकेचा निःश्वास सोडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ठाणे महानगरपालिकेजवळ, कचराळी तलाव बाजूला असलेल्या पदपथावर अज्ञात व्यक्तीने बऱ्याच वेळापासून बेवारस बॅग ठेवली आहे, अशी माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात मिळाली त्यानुसार घटनास्थळी पाहणी केली असता, एक बॅग लोखंडी बेंचला बांधून ठेवण्यात आली होती. बेवारस बॅगेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र या बॅगेचा तपास सुरु असतांना बॅगेचे मालक समीर कुमार सिंघ (४५) हे घटनास्थळी पोहोचले. सिंघ अपंग असल्याने या ठिकाणी आपल्या नातेवाईकांची वाट बघत असताना, नाष्टा करण्यासाठी सदरची बॅग बेंचला बांधून १० वाजण्याच्या सुमारास तिथून गेले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी धाव घेतली. ती बॅग मालकाच्या ताब्यात देऊन पुन्हा अशी चूक करू नका असे बजावण्यात आल्याची माहिती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here