अनिल देशमुख यांच्या घरी छापा मारण्यास गेलेल्या पोलीस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत झटापट

fight-in-police-and-ncp-karyakarata-in-nagpur

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलक) : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने छापेमारी केली, त्यावेळी सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले. देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, यादरम्यान देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट सुद्धा झाली.

पोलीसांनी गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी सीबीआय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरुद्ध नारेबाजी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट सुद्धा झाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजता नागपुरातील सीबीआय कार्यालयाची टीम सिव्हिल लाईन येथे असलेल्या अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचली, अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या १ महिन्यापासून घरी नाहीत. अनिल देशमुख यांचे निवासस्थानी सीबीआय टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी पोहोचले आहेत. याआधीही कारवाईसाठी, सीबीआय आणि ईडीने कार्यालय आणि निवासस्थानी अनेक वेळा कारवाई केली आहे,


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here