बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; ८० हजारांचा शस्त्रसाठा जप्त

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हवालदार वस्ती, मोशी येथे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वस्ती मोशी येथे चौधरी ढाब्याजवळ दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून गौरव आणि शंकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण ८० हजार ४०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी गौरव मच्छिन्द्र डोंगरे (वय २३, रा. बलुत आळी, चाकण), शंकर शिवाजी वाडेकर (वय ३०, रा. भांबोली, ता. खेड) या दोघांना अटक केली असून, खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here