मलकापूर (प्रतिनिधी) : दाताळा येथून जळगाव जामोदकडे विटा घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना वडनेर भोलजी नजीक असलेल्या ग्राम निंबोळा देवी नजीक सकाळी नऊ वाजेदरम्यान घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दाताळा येथील कापडे वीट उत्पादक येथून ४०७ क्रं.एमएच ०४, बीजी ५७०२ विटांनी भरून निंबा देवीमार्गे जळगाव जामोदकडे जात असताना निंबा देवी गावानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली यात राजु तेजलाल पुरवे (वय २५), धनराज जयसिंग ब्राम्हणे (वय ३२), शे.अजहर शे.ईसाक पटेल (वय २२), उमेश जगदेव भोलनकर (वय २५), विलास कचरु कळमकार (वय ३५) सर्व रा.बोराखेडी हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना नागरिकांच्या मदतीने ओम साई फाऊंडेशनचे विलास निंबाळकर, श्रीकृष्ण नालट, किशोर क्षीरसागर यांनी मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर जखमीतील उमेश भोलनकर, शे.अजहर शे.ईस्माईल, धनराज ब्राम्हणे या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.






