मैंदर्गी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र बंदला मोठया प्रमाणात प्रतिसाद

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : लखीमपूर खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाचा व अत्याचारित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंकाजी गांधी व इतरांना अटक केली याचा निषेध शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कांसाठी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते.

सोमवारी कॉंग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली मैंदर्गी बस्थान ते नगर परिषद चौक येथे जमून बंदचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here