जळगाव जिल्ह्यात कोरोनाने मोडला कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विक्रम

आज आढळले ४८७ कोरोनाबाधित रुग्ण तर १९९ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आजवरचे सर्वाधिक ४८७ रुग्ण आढळून आले असून, आत्तापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. आज (दि.७) कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ४८७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 13 हजार 574 झाली आहे. सर्वाधिक 99 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात 199 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
कोरोनाने आज चारशेचा आकडा पार केला आहे. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 99, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 23, अमळनेर 32, चोपडा 45, पाचोरा 8, भडगाव 43, धरणगाव 17, यावल 9, एरंडोल 79, जामनेर 28, रावेर 6, पारोळा 34, चाळीसगाव 26, बोदवड 4 इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here