शिल्पा शेट्टीच्या घरातील नवरात्री पूजेच्या व्हिडीओत राज कुंद्रा अनुपस्थित

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि चर्चित अभिनेत्रीपैकी एक म्हणजे शिल्पा शेट्टी देखील हा सण आनंदात साजरा करते आहे. शिल्पा जरी मॉडर्न असली तरी ती प्रत्येक सण आवर्जून साजरा करते. ती या संबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर करत असते. शिल्पा नेहमीच तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. सोमवारी शिल्पाने नवरात्रीच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल झाला आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती मुलगा वियनसोबत मॉ दुर्गाची पूजा करताना दिसत आहे. तर मुलगी समिशा बाजूला खेळताना दिसली. सगळे या सणाचा आनंद घेताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र या वेळीस शिल्पाचा पती राज कुंद्रा तिथे उपस्थित नव्हता. व्हिडीओत शिल्पा वियनला स्तोत्र शिकवत आहे. यात तिघांनीही केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. शिल्पाने या पोस्टला छानसे कॅप्शन दिले आहे. शिल्पाच्या या पोस्टवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले. तसंच याला दोन लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

शिल्पा अनेकदा तिच्या देवावर असलेल्या विश्वासाबद्दल मुलाखतीत बोलताना दिसली आहे. या आधीही शिल्पाने गणेश पूजनाचे व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. दरम्यान शिल्पाचा पती राजला पॉर्नोग्राफिक प्रकरणात १९ जुलै रोजी अटक झाली होती. त्याच्या अटकेमुळे शिल्पाला देखील अनेक अडचणींना समोरा जावे लागत आहे. राजवर ही अनेक आरोप करण्यात आले आणि अखेर २१ सप्टेंबर रोजी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुटकेनंतर राज अद्याप मीडियाच्या समोर आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here