अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर एका आयशर टेम्पो अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.
एक्सप्रेस-वेवरील रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो काही कारणांमुळे बंद पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिंग टिमने एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले. त्यानतंर काही वेळाने या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या आगीमध्ये टेम्पोच्या केबीनमध्ये झोपलेल्या एक व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाला टेम्पोतून काढून खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या दरम्यान लागलेल्या या आगीमध्ये आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. खोपोली अग्नीशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्नीशमन दलाने आगीवर नियत्रंण मिळवले. पण, या दरम्यान मुबंईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखुन धरण्यात आल्याने दोन किमीपर्यंत वाहनाच्यां रांगा लागल्या होत्या. देवदूत टिम, आय आर बी यंत्रणा, डेल्टा फोर्स, वाहतुक पोलीस पळस्पे, रसायनी पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक यंत्रणाचे टिम सदस्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियत्रंण मिळवून पुन्हा वाहतुक सुरळीत केली.






