दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार श्री शिवतीर्थाचे उद्‌घाटन; मान्यवरांनी केली पूर्वतयारीची पाहणी

इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा श्री शिवतीर्थचा उद्घाटन समारंभ सोहळा दि.१५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी दसरा शुभमुहूर्तावर सायंकाळी ४.३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरु असलेली पुर्वतयारी पाहणी आज दि.१३ ऑक्टोंबर रोजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी केली. यावेळी त्यांनी आचार्यश्री आनंद युवा मंच, इचलकरंजी यांचेकडून जनसेवा सुरू असलेल्या मोफत चपाती-भाजी केंद्रास प्रत्यक्ष भेट दिली.

free-chapati-bhaji-center-ichalkaranji

याप्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार, बांधकाम समिती सभापती उदयसिंह पाटील, मा.वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, मा.नगरसेवक संजय जाधव, दिलीपकाका मुथा, श्री.आवळे, भा.ज.पा.युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रविण पाटील, तरु कमिटी सदस्य.इ.न.पा. राहूल तेलसिंगे, भा.ज.पा.उद्योग आघाडी शहराध्यक्ष प्रितम बोरा, म.न.से.शहराध्यक्ष मोहन मालवणकर तसेच शिवभक्तांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here