यंदा पुण्याचा गणेशोत्सव साधेपणानेच – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (ऋषिकुमार फुले) – कोरोना महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि.७) दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीच्या दरम्यान अजित पवार बोलत होते.या दरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त विक्रमकुमार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याची मागणी केली आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्यात येणार आहे. याकरिता सर्व नागरिकांनी देखील सहकार्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. याअगोदरच पुणे महानगरपालिकेने देखील गणेशत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात दिवसभरात १२४९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, ११६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान ३१ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील आठ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांपैकी ७०३ क्रिटिकल रुग्ण असून, त्यात ४३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
सद्यस्थितीत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ६३२८६, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७०३३, एकूण मृत्यू -१४७९, आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ४४७७४ अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here