विनयभंगप्रकरणी दौंड येथील नगरसेवकावर गुन्हा दाखल

दौंड (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश जाधव यांच्याविरोधात सावकारी, विनयभंगप्रकरणी दौंड (ता. दौंड, जि. पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश जाधव यांच्‍यावर खासगी सावकारी व महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेश जाधव यांनी एका महिलेला २ लाख रुपये आठ टक्के व्याजाने डिसेंबर २०१९ रोजी दिले होते. ते पैसे या महिलेला मुदतीत फेडता न आल्याने राजेश जाधव याने फिर्यादीच्या बहिणीच्या घरामध्ये अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच शरीरसुखाची मागणी केली. पैसे कसे वसूल करायचे हे मला माहिती आहे. तू जर मला पैसे दिले नाहीस तर मला वेळ दे, असे म्हणून धमकावले.

त्यानंतर या महिलेने पोलीस ठाण्यात राजेश जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली. राजेश जाधव यांच्‍यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here