ठाणे जिल्ह्यात शेताच्या वाटणीवरून मुलाने केला वडिलांचा खून

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथे वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवार दि. १२ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुरबाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे या गावातील मंगल हरी शेळके (वय ५३) यांची त्यांचाच मुलगा रवी याने धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटने बाबत जयेश शेळके यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादी जयेश शेळके आणि संशयीत आरोपी रवी शेळके हे सावत्र भाऊ आहेत. रवी शेळके याने वडील मंगल शेळके यांचा वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून आणि सावत्र नात्याचा रागातून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे, सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. सोनाने यांनी तात्काळ भेट दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here