अहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – एव्हेंजलीन बूथ हॉस्पिटल, अहमदनगर, मानवतेचे मंदिर.. रुग्णसेवेचा ओलावा असणारी डॉक्टर, कर्मचारी, रूपातील देवमाणसे.. करोना विषाणू मुळे आपण सर्व सैरभैर झालो आहोत. हे सारं आपण अनुभवतोय.. न भूतो.. असं काही आपल्या आयुष्यात घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं..या साऱ्या संकटात रुग्णांवर मायेची, शुशृषेची फुंकर घालणारी माणसे आहेत या जगात..आपल्या शहरात…
जगण्याचे संदर्भ बदलत चाललीअसताना जगण्या विषयीची निष्ठा व जपलेली तत्वे यावर प्रेम करीत रुग्णसेवा करीत दुःख हलकी करणारी, जगण्याची उमेद वाढवणारी बूथ हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ, डॉक्टर्स यांना पाहिले,अनुभवले की जगण्यावरचा विश्वास वाटतो.
आर्थिक अडचणी असताना, कोणतेही सरकारी अनुदान नसताना केवळ रुग्णसेवेचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारी माणसे पाहिली की आपले हात आपोआप जुळतात… .
आणि हे सारे पाहताना, ऐकताना या खऱ्या, रुग्णसेवेला मनापासून सलाम करणारी श्री. प्रदिप गांधी यांच्यासारखी कनवाळू, व अतिशय संघर्षाच्या वातावरणातही लोकांसाठी काही करता येईल का याचा विचार करणारी माणसे पहिली की माणुसकीचा झरा जिवंत आहे याचाही अनुभव येऊ लागतो. दुनिया अशाच लोकांमुळे उभी आहे. त्याचा श्वास चालू आहे निरंतर..असे वाटू लागते..
अहमदनगर मधील कोहिनूर या महाराष्ट्रात नावाजलेल्या वस्त्र दालनाचे संचालक असलेल्या व शहरावर मनापासून प्रेम करीत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, उपक्रमात आपले बहुमूल्य योगदान असलेल्या प्रदीपजी यांनी आज आपला लाडका नातू चिरंजीव ऋषी याच्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित न करता बूथ हॉस्पिटलला त्यांच्या सेवाभावी कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या विचाराने एक्कावण्ण हजार रुपयांची(51,000)देणगी हॉस्पिटलचे डॉ मेजर श्री.देवदान कळकुंभे यांना सुपूर्द केली.. या सोनियाच्या क्षणी मलाही उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले..
समाज जागरूक असेल तर समाज घडत असतो. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना अंगी असणारी प्रदीप गांधी यांच्यासारखी माणसे असली की आयुष्यावरचा विश्वास वाढू लागतो.
धन्यवाद प्रदिपजी .. धन्यवाद डॉ.कळकुंभे व बूथ हॉस्पिटल स्टाफ..तुमच्या रूपाने देव जमिनीवर संचार करीत असतो….
हेच खर..डिअर ऋषी हॅपी बर्थ डे..god bless..







