जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : काही दिवसांपूर्वी गैर काश्मिरींना लक्ष्य केल्यानंतर भारतीय सेनेने दहशतवाद्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एका मागोमाग एक अनेक चकमकी होत आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. अशाप्रकारे काल पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये सुरक्षाबलांनी एनकाऊंटर केला. या एनकाऊंटरमध्ये लष्कराच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले. आता या चकमकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट कळते की, लष्कराने आता खोऱ्यातून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सुरक्षा दलांना कोणत्याही किंमतीत कोणतीही चूक करायची नाही.
पंपोर चकमकीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराच्या जवानांनी ज्या घरात दहशतवादी लपले होते ते घरच उडवले आहे. जेव्हा सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या लपल्याची माहिती मिळाली, तेव्हा चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला, तर दुसरा इमारतीत लपला होता. यानंतर, स्थानिक लोकांना या भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, जेणेकरून त्यांना यात इजा होणार नाही. नंतर लष्कराच्या जवानांनी स्फोटाद्वारे संपूर्ण घर पाडले. यामध्ये दुसरा दहशतवाद्याचाही खात्मा झाला. २१ सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक घर दिसते. यामध्ये दहशतवादी लपून सुरक्षा दलांवर हल्ला करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सैनिकांनी इमारतीलाच लक्ष्य केले.
Saturday Pampore encounter #Kashmir pic.twitter.com/a8TJ321wAt
— Ashraf Wani اشرف وانی (@ashraf_wani) October 17, 2021
स्फोट होताच इमारत काही सेकंदात कोसळली. संपूर्ण परिसरात मलब्याचे ढीग पसरले. धुळीने घराच्या सभोवतालचा परिसर भरून गेला. त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या वाहनांचे आवाजही ऐकू आले. व्हिडिओ पाहताना स्पष्टपणे दिसून येते की यावेळी लष्कर नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. या संदर्भात, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरपासून नवी दिल्लीपर्यंत बैठका घेण्यात आल्या आहेत, ज्यात एनएसए अजित डोभाल देखील सहभागी झाले आहेत. अलीकडेच, पीएम मोदींनी अजित डोवाल यांच्याशी काश्मीर आणि सीमेवरील परिस्थितीबद्दल संभाषण केले. तेव्हापासून असा अंदाज लावला जात होता की, सरकारने दहशतवाद्यांविरोधात महत्त्वाची रणनीती आखली आहे.






