भररस्त्यात तरुणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा; व्हिडीओ झाला व्हायरल

भोपाळ (मध्यप्रदेश) : येथील ईटखेडी भागात एका तरुणीला बुरखा घालण्यावरुन काही लोकांनी गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रेम युगूल भोपाळमधील इटरखेडी भागात फिरायला गेलं होतं. त्यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. तेव्हा काहीजणं आले आणि त्यांनी प्रेमी युगूलाला नाव विचारलं आणि दुसऱ्या जातीचं असल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीचा बुरखा काढायला लावला.यानंतरही त्यांनी ऐकलं नाही आणि बुरखा उतरवण्यासाठी चेहऱ्यावर बांधलेला कपडा काढू लागले. ज्यावर युगूलाने आक्षेप घेतला आणि बुरखा देऊन कसं बसं करीत तेथून निघून गेले.

हा संपूर्ण घटनाक्रम मोबाइलमध्ये कैद करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ईटखेडी ठाण्यात पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल कर कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात शहरातील संस्कृती बचाव मंचाने तरुणीच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा हटविण्याचा विरोध केला आहे.

संस्कृती बचाव मंचाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी याने सांगितलं की, इस्लाम नगरमध्ये एक युगूलला पकडून तरुणीच्या शरीरावर बुरखा काढला आहे. इथपर्यंत तर ठीक होतं, मात्र येथील लोकांनी जबरदस्ती त्या मुलीच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा हटवला आणि तिच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन केलं. तरूणीने वयाची १८ वर्षे पूर्ण केले असून ती स्वतंत्र आहे.

पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारच्या गुंडावर तातडीने कारवाई करण्यात येते. भोपाळमध्ये एसएसपी इरशाद वलीने सांगितलं की, तक्रार आली नसतानाही आम्ही कारवाई केली आहे. कोणत्याही तरुणीवर अशा प्रकारे जबरदस्ती केली जाऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here