जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : रविवारी दिनांक.१७/१०/२०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ, जि जळगाव येथे फळे भाजीपाला मार्केट, लिंबू मार्केट लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी उद्घाटन करतांना माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, पंढरीनाथ तुकाराम पाटील, भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रवादी भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक इकबाल बागवान, नगरसेवक दुर्गेश ठाकुर व लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






