एस.टी.वर्कर्स कॉंग्रेस कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी. कर्मचारी मेळावा संपन्न

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : ऱविवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेस कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी. कर्मचारी मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे करण्यात आल होते.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असणाऱ्या लालपरीने खाजगीकरणाच्या या युगात दिलेली सेवा अभूतपूर्व आहे. गेल्या १ जून ला एसटीने सेवेची ७३ वर्ष पूर्ण करून ७४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. महामंडळातील कर्मचारी-अधिकारी यांच्या अविरत कष्ठामुळे आज एसटी महाराष्ट्राची जीवनदायिनी बनली आहे.

kolhapur-congress

स्पर्धेच्या युगात एस.टी.ची हीच विश्वासहर्ता टिकविण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. संप काळात एस.टी. कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेले खटले कसे मागे घेता येतील याचा कायदेशीर अभ्यास करून हे खटले मागे घेण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण दळणवळणाचा कणा असणारी एसटी चांगल्या प्रकारे चालली पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यातून दिवाळीपूर्वी मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

यावेळी, आमदार पी एन पाटील, इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, इंटकचे सचिव मुकेश तिकोटे, इंटकचे राज्य उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे, दत्तात्रय गूठे, आनंदराव दोपारे, एम के भोसले, सारिका शिंदे, अण्णा बनसोडे यांच्यासह महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेसचे विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, सदस्य एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here