मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर ६ जखमी

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बोरघाटजवळ ६ वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची आणि जखमींची नावे समजू अद्यापही शकली नाहीत.



अपघात झाल्यानंतर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबडयांनी भरलेल्या ट्रकला एक कार धडकली. यानंतर मागून येणारा एक भरधाव ट्रेलर कारला धडकला.


या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा असून, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांचे एक पथक तात्काळ पोहचले व त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली आहे. अपघातात ट्रक चालकाचा दोष समोर येत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here