वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वन विभागाच्या बुटीबोरी पथकाने केले जेरबंद

यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : शहरा लगतच्या किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर शनिवारी हे पथक यवतमाळात दाखल झाले. त्यांनी किटा-कापरा जंगलात सर्च घेतला. किटा येथील एका घरातून वाघाचे अवयव जप्त केले.

रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ बी ५१५२) याची वनविभागाच्या पथकाने झडती घेतली. त्यात आराेपींकडे वाघाची नखे, दात आढळून आले. त्यानंतर वन पथकाने आराेपी प्रकाश महादेव काेळी रा. कामनदेव ता. नेर, प्रकाश रामदास राऊत रा. वरुड ता. बाभुळगाव, अंकुश बाबाराव नाईकवाडे रा. ईचाेरी ता. यवतमाळ, संदीप महादेव रंगारी रा. वर्धा, विनाेद श्यामराव मून रा. सावळा ता. धामणगाव जि. अमरावती, विवेक सुरेश मिसाळ रा. अंजनगाव जि. अमरावती, याेगेश माणिक मिलमिले रा. वरुड जि. अमरावती यांना अटक केली.

या अराेपींनी २०१८ मध्ये उमरडा जंगलात वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. मात्र आराेपींना वन पथकाला खाेटी माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सहायक वनसंरक्षक नरेंद्र चंदेवार व संदीप गिरी हे पथकासह यवतमाळ शहरा लगतच्या उमरडा जंगलात पाेहाेचले. तिथे त्यांना काही आढळले नाही. दिशाभूल केल्याचे लक्षात येताच वन अधिकाऱ्यांनी आराेपीला वेगळ्या शैलीत चाैकशी केली. तेव्हा त्याने खरी माहिती देत वाघाची शिकार ही हाेळीच्या दरम्यान किटा जंगलात केल्याचे सांगितले. त्यावरून वन पथकाने किटा हे गाव गाठले तेथे घनदाट जंगलात हाडांचा सापळा आढळला. तर किटा गावातील एका घरातून हाड व एक नख जप्त करण्यात आला. तब्बल १० किलाे वजनाची हाड जप्त केली. इतर तिघांनाही अटक केली असून त्याची सखाेल चाैकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here