ईडी चौकशीसाठी अभिनेत्री जॅकलिन चौथ्यांदा गैरहजर

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बेकायदेशीर सावकारी प्रकरणी जॅकलीन ईडीच्या रडारवर असून, २०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीन चौथ्यांदा गैरहजर राहिली आहे. आज सोमवारी जॅकलिनला ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते. मात्र, ती हजर राहू शकली नाही. यापूर्वी १६ ऑक्टोबरलादेखील जॅकलिन चौकशीसाठी हजर राहिली नाही.

गेल्या चार दिवसात जॅकलिनला तीनवेळा ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती ईडी कार्यालयात उपस्थित राहिली नाही. याआधी २५ सप्टेंबरलादेखील समन्स बजावूनदेखील जॅकलिन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. जॅकलिनने खाजगी कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. तिने शुक’वारी ईडीच्या अधिकार्‍यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत चौकशी पुढे ढकलावी, अशी विनंती केल्याचे समजते.

तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करीत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार कारागृहातून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या, पण चौकशीदरम्यान तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती कारागृहात असल्याची कल्पनादेखील नव्हती, असे जॅकलिन म्हणाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here