कुड्डालोर (तामिळनाडू) : जिल्ह्यातील शासकीय नंदनार मुलांच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थ्याला वेळेवर वर्गात न आल्याबद्दल अमानुषपणे मारहाण केली. ही मारहाण सुरु असतांना वर्गातील विद्यार्थ्यांनी याचा व्हिडीओ करुन सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चिदंबरम येथील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा मारल्याचा आरोप आहे. चूक पुन्हा करणार नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कडलोर जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Caste cruelty in schools.
Physics teacher of a govt school brutally flogged and kicked a SC minor boy while holding him by his hair. This mind distracting video is from TN's Cuddalore. #CrushTheCaste pic.twitter.com/Tm4GTFTq8i— Mission Ambedkar (@MissionAmbedkar) October 15, 2021
याबाबत बोलताना सरकारी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, ‘आठ विद्यार्थी बुधवारी शाळेत आले आणि पहिल्या तासात उपस्थित होते, पण भौतिकशास्त्राच्या दुसऱ्या तासाला वर्गात उपस्थित राहिले नाहीत. सुब्रमण्यम वर्गात दररोज चाचण्या घेत असल्याने या आठ विद्यार्थ्यांनी वर्गात न जाण्याचा निर्णय घेतला. शाळेचा दौरा करताना मी या विद्यार्थ्यांना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेले पाहिले आणि त्यांना पुन्हा वर्गात नेले. मी शिक्षकांना त्यांना वर्गात बसू देण्याची विनंती केली. सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना वर्ग सोडण्यास सांगितले आणि नंतर त्यांना मारले. एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ त्याच वर्गातील दोन मुलांनी रेकॉर्ड केला आहे.’






