छाया साखरे महात्मा गांधी रत्न अॅवार्डने सन्मानित

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : येथील कृष्णा चव्हाण फाउंडेशन यांच्याकडून छाया साखरे यांना महात्मा गांधी रत्न अॅवार्ड प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता बॉलिवूडची पार्श्वगायिका, शास्त्रीय गायिका, सामाजिक कार्यकर्ता आणि अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. छाया साखरे यांनी महात्मा गांधी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कृष्णा चव्हाण फाउंडेशनला धन्यवाद दिले आहेत.

क्लासिकल सिंगर्,बॉलीवुडप्लेबेक सिंगर,समाज सेविका, प्रख्यात अभिनेत्री,लोक न्रुत्य कोरिओग्राफर आणि मुंबई महानगरपालिका पालिका येथील स्पेशल संगीत शिक्षिका तसेच उत्तम म्युझिक डायरेक्टर अश्या एक ना अनेक कौशल्याने परीपुर्ण अशी अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या मुळत: लातुर,महाराष्ट्रातील रहिवासी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या छाया भानुदास साखरेजी यांना नुकतेच “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड” ने सन्मानित केले.

श्रीमती.छाया साखरे गेल्या अनेक वर्षात मुंबई त राहुन कला- साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तळागाळातील गरीब होतकरु प्रतिभावान मुलांना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात अनेक नवनविन उपक्रम त्यांनी राबविले आहेत गरीब होतकरु,जिद्द चिकाटी असणारे अनेक विद्यार्थी ज्यांच्या मध्ये भरपुर प्रतिभा दडलेली असते अशांची प्रतिभा ओळखुन त्यांचे टेलेंट ला योग्य दिशा देऊन मोठा प्लेटफोर्म मिळावा याकरिता सतत प्रयत्नशील राहुन विद्यार्थींना स्टेज उपलब्ध करुन देणे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता तसेच आर्थिकद्रुष्ट्या मदत ही छाया जी वेळोवेळी करत असतात.

आजपर्यंत छायाजीं ना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार ने तसेच आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यामुळे आदर्श स्त्रीशक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. छायाजींना मिळालेल्या आजपर्यंतचे पुरस्कार -“आदर्श संगीत शिक्षिका महापौर पुरस्कार ” ( in whole Mumbai,Maharashtra).,”गिरनार संगीत रत्न अवार्ड” (बेस्ट क्लासिकल संगित सिंगर ,गुजरात.), “एम्पोवरिंग विमन्स अॉफ इंडिया नेशनल लेवलअवार्ड”,”राज्यस्तरीय सावित्री देवी फुले आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार , “राज्यस्तरीय संगीत कलारत्न पुरस्कार. “,”विदर्भ रत्न अवार्ड.”,”नेशनल युथ आयकोन अवार्ड.”,”आय.टी. गोल्डन ग्लोब नेशनल अवार्ड.”,”उत्क्रुष्ट शास्त्रीय गायिका सुरमणी अवार्ड”. “ईंटरनेशनल आयडोल अवार्ड.,”पीस अॉफ इंडिया परिवार अवार्ड.,अमेझिंग इंडियन पर्सनालिटी अवार्ड, “OMG book of record “मध्ये नामांकन. ” Nation Pride book of record” मध्ये नामांकन, “Star Record Book of International”मध्ये नामांकन, “दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवार्ड”ने सन्मानित, “IIU INTERNATIONAL RESEARCHER अवार्ड “२०२१.ईंटरनेशनल फेलोशिप., मुंबई ग्लोबल प्रेजेंन्स ” इंडियन्स स्टार अवार्ड”., MMT MODEL INDIAप्रेजेंन्स”एम.एम.टी फॅशन इंडिया अवार्डस्२०२१ याप्रमाणे आहेत.

श्रीमती.छाया साखरे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांबद्दल समाजामध्ये सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका विदुषी,”पद्मभूषण”, श्रीमती डॉ.प्रभा अत्रेजी आणि “पद्मश्री.” श्री.अनुप जलोटाजी हे दोन्ही सांगितिक क्षेत्रातील छाया जीं च्या गुरूंनी त्यांचे खुप कौतुक केले आणि पुढील वाटचाली साठी त्यांचे शुभाशिर्वाद ही त्यांना दिले. याप्रसंगी बोलताना छाया साखरे यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here