जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : केन्द सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या लसीकरण कार्यक्रम आज श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्यावतीने आज दि. १८/१०/२०२१ सोमवार रोजी कोरोना लसीकरण शिबिर बालाजी मंदिरामधे घेण्यात आले.
या शिबिराचे शुभारंभ पुजा श्याम भाटीया या महिलेला प्रथम लसीकरण डोस देवुन करण्यात आले, या प्रसंगी बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील सर व उपाध्यक्ष गुलाबराववाघ, कार्याध्यक्ष जिवनआप्पा बयस, हे उपस्थित होते.
या वेळी उपस्थित असलेले डॉ. मयुर जैन, श्री उमेश येवले, आर के देशमुख, निलेश वाणी, पुनीत चौधरी, सौ. दीपा मोरावकर सिस्टर यांचा श्रीफळ देवुन मंडळाचे संचालक चन्द्रकांत अमृतकर, प्रशांत केले, महेंद्र बयस यांनी सत्कार केला. या शिबिरास सहसचिव प्रशांत वाणी व मंडळाचे सदस्य, प्रमोद जगताप, किशोर वाणी, गणेश राजपूत व अरुण महाले शाम भाटिया, पुनीत चौधरी यांनी परीश्रम घेतले.
या वेळी मंडळाने आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, परीसरात लसीकरण जवळच झाले म्हणून नागरिक व वृद्ध यांनी मंडळाला धन्यवाद दिले आहेत. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे सहकार्य व मदत केली त्या बद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील व उपाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी आभार मानले.






