मरशिवनी तांडा येथे नागरी सुविधेच्या मागणीसाठी धरणे व निदर्शने अंदोलन

अहमदपूर (प्रतिनिधी अजय कल्याणे) : सोमावर (दि.१८) शहरापासून जवळ असलेल्या मरशिवनी तांडा येथे नगर पालीकेच्या वतीने तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर सम्राट मित्र मंडळ आणी मरशीवनी तांडा येथील बंजारा बांधवांच्या वतीने युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली धरने व निदर्शने अंदोलन करण्यात आले.

प्रामुख्याने गेल्या दोन वर्षां पूर्वी मरशिवनी तांडा हा नगर पालिका हद्दीत आला आहे. मात्र अद्याप पर्यंत नागरी सूविधे पाहून हा भाग कोसो दूर आहे.त्यामूळे नागरीकांना दैनंदिन अडचणीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रशासनाने मरशिवनी तांडा येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर करावे,शौचालय बांधकासाठी निधी मंजूर करावे,येथील नियमीत स्वच्छता करावी,पिण्यासाठी शुध्द पाणी पूरवठा करावा,येथे नवीन बोअर घेण्यात यावे, येथील घरांच्या मालमत्ता रजिस्टरला नोंदी घ्यावेत,गावात सिमेंट काँक्रिट रोड करावे,पथदिवे तातडीने बसवून द्यावे,फाॅगींग मशीनने तांड्याची संपूर्ण फवारणी करावी आदी मागण्यां निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

ahmedpur-andolan

या प्रसंगी युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,पंचायत समितीचे कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,गौर सेनेचे तालूकाध्यक्ष संतोष, राठोड,प्रभाकर जाधव सर आदींचे समायोचीत भाषणे झाली. या वेळी आकाश सांगविकर,शरद कांबळे,कैलास भालेराव,अजय भालेराव,सचिन बानाटे,संगमेश्वर बनसोडे,बापू कदम,आनंद सोनकांबळे, सतीश कदम,संतोष जाधव,रवी गायकवाड,सय्यद नौशाद,नूर मोहम्मद,राम जाधव, गजानन जाधव,किशन राठोड,अजय राठोड, राम पवार,शांताबाई जाधव,सरूबाई जाधव,अभिजीत जाधव,बापूराव जाधव,रवी राठोड, बाबूराव चव्हाण,वामन चव्हाण,अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here