अंबरनाथ येथे रेल्वे पोलिसाने वाचवले तरुणाचे प्राण

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : रेल्वे पोलिसाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका तरुणाला “कार्डियो पल्मोनरी रिससिटैशन” (सीपीआर) देत त्याचे प्राण वाचवल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर १५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास महेश सुर्वे नावाचा २२ वर्षीय तरुण प्लॅटफॉर्मवर असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता होती.

यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलीस कर्मचारी मोहन दास यांनी तिथे धाव घेत महेश सुर्वे याला सीपीआर पद्धतीने प्राथमिक उपचार दिले. त्यामुळं काही वेळातच महेश हा शुद्धीवर आला. ही घटना रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश याला रेल्वे स्थानकातील दवाखान्यात नेण्यात आलं.

प्राथमिक उपचार करून त्याला नातेवाईकांसोवत खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचल्याने सध्या रेल्वे पोलीस मोहन दास यांचे कौतुक होत आहे. तसेच रेल्वे पोलिसांसोबत इतर प्रवाशांनी देखील त्या तरुणाला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here