गोला नदीवरील पुल तुटला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले दुचाकीस्वाराचे प्राण; पहा व्हिडीओ

डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे खूपच भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठे दरड कोसळत आहे तर कुठे भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. भूस्खलनामुळे नैनीतालला जाणारे तिन्ही महामार्ग बंद झाले. यामुळे अनेक प्रवासी, पर्यटक हे रस्त्यातच, हॉटेल्समध्ये अडकले आहेत. मुसळदार पावसात गोला नदीवरील पूल अचानक तुटला. पूल तुटत असताना समोरून एक दूचाकीस्वार येत होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या बाईकस्वाराला ओरडून परत जाण्यास सांगितले.

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बाईकस्वाराचे प्राण वाचले आहेत. जर स्थानिकांनी वेळीच बाईकस्वाराला याबाबत कळवले नसते तर मोठी दुर्घटना झाली असती. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयने ट्विट केला आहे.

दरम्यान, केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेले २२ भाविक मुसळधार पावसात अडकले होते. पावसात भाविक अडकले असल्याची माहिती एसडीआरएफ, उत्तराखंड पोलिसांना मिळाली. त्यानंतर या सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here