पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘मानसिक आरोग्य आणि त्याचा कामाच्या ठिकाणी होणारा परिणाम’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे .
डॉ सुषमा भोसले या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत .हा वेबिनार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी ही माहिती दिली .सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत .अधिक माहिती http://www.allanacollegeofpharmacy.orgया संकेत स्थळावर देण्यात आली आहे.






